Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यातील वेश्या व्यावसाय प्रकरणात गुन्‍हे दाखल

पुण्यातील वेश्या व्यावसाय प्रकरणात गुन्‍हे दाखल

अमली पदार्थ बाळगल्‍याचाही गुन्‍हा

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती बुधवार पेठेत महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्‍या प्रकरणात गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अमली पदार्थ बाळगल्‍यामुळे गुन्‍हा दाखल केला आहे. या कोंबीग ऑपरेशन कारवाईत आतापर्यंत तीन गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत.

मद्यधुंद चालकाच्या धडकेत डिलेव्हरी बॉयचा मृत्‍यू – सविस्तर बातमी 

पहिल्‍या गुन्‍ह्यात महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्‍यांना वेश्या व्यावसायास प्रवृत्‍त केले. तसेच महिलांना कुंटण खाण्यात ठेऊन वेश्या व्यावसायातून मिळणाऱ्या कमाईवर उपजिका भागविणाऱ्या दोघांवर गुन्‍हा दाखल केला आहे. याप्रकरणी रणजित आणि त्‍याच्‍या साथीदारावर पोलिस निरीक्षक छगन कापसे यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंधक कायदा (पीटा) नुसार गुन्‍हा दाखल केला आहे. बुधवार पेठेतील सपना बिल्‍डींग येथे कोंबींग ऑपरेशनद्वारे कारवाई केल्‍यानंतर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

तरूणीला वेश्या व्यावसायस प्रवृत्‍त करून तिला पैशाचे आमिष दाखविण्यात आले. नंतर तिला कुंटणखाण्यात ठेऊन वेश्या व्यावसाय करून घेतल्‍या प्रकरणात राजन, मुल्‍ला, शांताबाई, जोहरूद्दीन शेख आणि रेश्मा नावाच्‍या महिलेवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक कांचन मोहन जाधव यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून हा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेतील माचिस बिल्‍डींग येथे कारवाई करत पीटा अन्वये गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्‍यान तिसरा गुन्‍हा बुधवार पेठेत केलेल्‍या कारवाईत चेतक हॉटेल समोरील सार्वजनिक रस्‍त्‍यावर चरस बाळगल्‍याप्रकरणात पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेत त्‍याच्‍यावर गुन्‍हा दाखल केला. रामेश्र्वर विभिषण बिराजदार (31, रा. गणजरा हॉटेलच्या पार्कींग मधीलखोलीत, बाजीराव रोड, मुळ रा. लातूर) असे गुन्‍हा दाखल करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई सुमित खुट्टे यांनी फिर्याद दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×