गॅस कनेक्शन बंद करण्याचा केला मेसेज, सायबर चोरट्यांनी ८९ हजारांना घातला गंडा
Marathinews24.com
पुणे – सायबर चोरट्यांनी पुणेकरांना वेठीस धरले असून, विविध प्रकारची भीती अन आमिष दाखवून ऑनलाईन लुट केली जात आहे. दिवसेंदिवस लुटीच्या घटना वाढीस लागल्या असून, सायबर चोरट्यांविरुद्ध कारवाईची मागणी नागरिकांकडून केली आहे. प्रामुख्याने पार्टटाईम नोकरी, गिफ्टचे आमिष, डिजीटल अटक करण्याच्या धमकीने ऑनलाईन गंडा घातला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे.
शनिवारवाडा पाहण्यासाठी शाळा बुडवली; वडिलांच्या रागामुळे मुलगी घरातून नघून गेली – सविस्तर बातमी
एमएनजीएल गॅस कनेक्शन बंद करण्याची धमकी देउन सायबर चोरट्यांनी कोंढव्यातील तरूणाला तब्बल ८९ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. याप्रकरणी दिपककुमार दुगट (वय ३४, रा. टिळेकरनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाइलधारक सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपककुमार दुगट हे कोंढव्यातील टिळेकरनगरात राहायला असून, ३ एपिलला सायबर चोरट्यांनी त्यांना मेसेज केला. तुमचे एमएनजीएल गॅस कनेक्शन मागच्या महिन्याचे गॅस बिल अपडेट झाले नाही. तुम्ही जर बील जमा केले नाही तर, आम्ही तुमचे गॅसकनेक्शन बंद करू, अशी धमकी दिली.
दीपककुमारने संबंधिताला फोन केला असता, सायबर चोरट्याने एमएनजीएलमधून बोलत असल्याचे सांगितले. बील जमा करण्यासाठी मोबाईलमध्ये आयसीआयसीआय बँकेचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. तक्रारदार दुगट यांनी संबंधित अॅप डाउनलोड केल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याचा अॅक्सेस घेउन खात्यातील ८८ हजार ९८० रुपये ऑनलाईन काढून घेतले. फसवणूक झाल्याप्रकरणी मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक मयुर वैरागकर तपास करीत आहेत.