Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

संत तुकाराम महाराज पालखीचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केले सारथ्य

काकड आरतीनंतर तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन; भवानी पेठ ते पुलगेट पालखी रथाचे केले सारथ्य

marathinews24.com

पुणे – आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी आज पहाटे पुण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान केले.  उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी आषाढी वारीनिमित्त  निवडुंगा विठोबा मंदिर, भवानी पेठ येथे जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखीचे दर्शन घेतले, याप्रसंगी  पहाटे सहा वाजता उपमहापौर वाडेकर यांच्या हस्ते काकड आरती संपन्न झाली. यानंतर जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेत त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच भवानी पेठ ते पुलगेट दरम्यान पालखी रथाचे सारथ्य वाडेकर यांनी केले.

केंद्रीय संचार ब्यूरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन – सविस्तर बातमी

यावेळी देहू संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे महाराज यांच्या शुभहस्ते उपमहापौर परशुराम वाडेकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पालखी सोहळ्याच्या परंपरेनुसार पालखीचे स्वारस्य (मानाचा सन्मान) उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक विशाल धनवडे, देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, ट्रस्टचे पदाधिकारी, वारकरी, भाविक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमहापौर यांनी  संत श्रेष्ठ ज्ञानदेव महाराज पालखीचे पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ येथे दर्शन घेतले यावेळेस  संत ज्ञानेश्वर महाराज ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी उपमहापौर  वाडेकर यांचा सन्मान केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×