महिलांमध्ये पार्किंग वादातून हाणामारी, झिंजा धरून धक्काबुक्की
Marathinews24.com
पुणे – सोसायटीच्या पार्किंगमध्ये अनधिकृतपणे पत्रे उभारल्याचा जाब विचारल्याने आरोपी महिला सभासदाना महिलेला भिडल्याची घटना धायरीतील रिद्धी सिद्धी पॅराडाईज सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी समीर आणि मल्लिका पायगुडे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सोसायटीच्या सेक्रेटरी अनिल दरोली यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
ऑनलाइन गेमच्या नादात बँक खाते रिकामे – सविस्तर बातमी
पार्किंगमधील अनधिकृत बांधकामावरून वाद उफाळून आला आहे. सोसायटीतील फ्लॅटमधील रहिवाशाने पार्किंगमध्ये पत्रे लावून फॅब्रीकेशनचे अनधिकृत काम सुरू केले होते. सोसायटीकडून नोटीस दिल्यानंतरही काम थांबवले गेले नाही. त्यामुळे सर्व सभासदांची बैठक घेऊन बांधकाम हटवण्याचा निर्णय घेतला. ११ एप्रिलला सकाळी हे बांधकाम काढण्यास सुरुवात झाली. त्यावेळी आरोपी समीर पायगुडे यांनी विरोध करीत सेक्रेटरी अनिल यांना रॉडने धमकावले. तुम्ही आमचं ऐकत नाही, आता दाखवतो म्हणत मारहाण केली. त्याचबरोबर आरोपी मल्लिका यांनीही महिलांना शिवीगाळ करत, त्यांच्या केसांना धरून मारहाण केली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.