आपले सरकार सेवा केंद्र चालकांना अर्ज भरण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील ग्रामीण भाग (महसूल मंडल), नगर पालिका व शहरी भागातील महानगर पालिका येथे सद्यस्थितीमध्ये आवश्यकतेनुसार आधार केंद्र सुरू करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आधार संच वितरण करण्यात येणार आहे.
या संदर्भात पात्र ‘आपले सरकार सेवा केंद्र’ चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.pune.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, ग्रामीण भाग (महसूल मंडल), नगर पालिका व महानगरपालिका क्षेत्रनिहाय प्रस्तावित आधार केंद्राबाबतची माहिती तसेच इतर आवश्यक गाहिती डाऊनलोड करून घ्यावी. इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक 9 ते 23 मे 2025 वा. पर्यंत सकाळी 11 वाजल्या पासून ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) जिल्हाधिकारी कार्यालय (संजय गांधी योजना शाखा), अ विंग, 4 था मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पुणे येथे प्रत्यक्ष सादर करावेत, अर्ज भरण्याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे तहसिलदार संजय गांधी योजना शाखा यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.