कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा

कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा

जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे बहुउद्देशीय हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन

marathinews24.com

पुणे – शासन महसूल व वन विभागाकडून २३ मे २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये राज्यात बांधकामासाठी कृत्रिम वाळू वापरासंबंधी धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात प्रथम पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्रातील नोंदणीकृत ५० संस्थांना M-sand युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग व महसूल विभागाच्या सवलती लागू राहणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाकरिता शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर – उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी 

शासनाच्या १७ जुलै २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये कृत्रिम वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून त्याबाबत आवश्यक माहिती देण्यासाठी मंगळवार, दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील पाचव्या मजल्यावरील बहुउद्देशीय हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत MPCB, DIC, बँक, वन, नियोजन प्राधिकरण, GSDA, PWD आदी विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. M-sand युनिट उभारण्यासाठी इच्छुक व्यावसायिक, क्रशरधारक व खाणपट्टाधारक यांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×