Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणी

पुण्यात खासगी विद्यार्थी वसतिगृहातून लॅपटाॅप चोरीला

रुग्णालयाबाहेर माजवली दहशत

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवडा भागात एकाने ७५ वर्षीय डाॅक्टरला धमकावून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. आरोपीने तीक्ष्ण शस्त्र उगाररुन रुग्णालयाच्या परिसरात दहशत माजविली. याप्रकरणी अमोल पिल्ले (वय ४५, रा. जयजवाननगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डाॅक्टरांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; आरोपी अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय डाॅक्टरांचा येरवड्यातील जयजवाननगर भागात खासगी दवाखाना आहे. ते येरवडा भागातील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरात राहायला आहेत. आरोपी ८ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास रुग्णालयात आला. त्याने डाॅक्टरांना तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखविला. त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे डाॅक्टरांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

खंडणीसाठी डाॅक्टरांना धमकाविण्यात आल्यानंतर आरोपी रुग्णालयातून बाहेर पडला. त्याने रस्त्यावर येऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपीने शस्त्र उगारून रस्त्यावर दहशत माजविली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीविरुद्ध खंडणी मागणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरवसे तपास करत आहेत. दरम्यान, डोबिंवलीतील शिवसेनेचे (शिंदे गट) पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिला डाॅक्टरला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×