प्रा. जयंत लेले यांना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

“बौद्धिक क्षेत्रातील मोठी हानी झाली आहे” – डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – “भारतीय सामाजिक विचारसरणीच्या सखोल अभ्यासासाठी आणि तिच्या प्रसारासाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या प्रा. जयंत लेले यांच्या निधनाने बौद्धिक क्षेत्रातील एक महत्वाचा दीपस्तंभ हरपला आहे,” अशा शब्दांत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

कै. कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृतिदिनानिमित्त आंतर शालेय क्रॉसकंट्री २०२५ स्पर्धा – सविस्तर बातमी 

“कॅनडा येथील अभ्यासासेबत त्यांनी भारतीय सामाजिक विचारसरणीचा अभ्यास आणि प्रसार यासाठी अखंड कार्य केले. एक सखोल विचारवंत, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या संशोधनाने आणि लेखनाने सामाजिक शास्त्राला नवीन दिशा दिली,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

“त्यांच्या जाण्याने मोठी बौद्धिक आणि मानवी हानी झाली आहे. त्यांच्या परिवारावर, सहकाऱ्यांवर आणि अनुयायांवर आलेल्या या दुःखात मीही सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो,” अशा शब्दांत डॉ. गोऱ्हे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×