गुलटेकडी परिसरातील उड्डाणपूलावरील घटना
marathinews24.com
पुणे – भरधाव अज्ञात वाहन चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जेष्ठाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात ११ ऑक्टोबरला दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलावर घडला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेअर ट्रेडींगच्या आमिषाने तरूणाला ३५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
नरसिंगमल उत्तमचंद तातेड (वय ७६, रा. शांतीनगर सोसायटी कोंढवा) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांच्या मुलाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार नरसिंगमल हे ११ ऑक्टोबरला दुपारी पावणेचारच्या सुमारास गुलटेकडी परिसरातील उड्डाणपूलावरून घरी जात होते. त्यावेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहन चालकाने नरसिंगमल यांना धडक दिली. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी अज्ञात वाहन चालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकीता पवार तपास करीत आहेत.



















