Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

विश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून

ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ट्रकच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर कुंजीरवाडी परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अन्नपूर्णा गुरु (वय ६४, रा. मोरया सोसायटी, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याबाबत अन्नपूर्णा यांचा मुलगा अभिजित (वय ३९) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार आजोबा, नातीचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा या १३ मार्च रोजी पुणे सोलापूर रस्त्याने निघाल्या होत्या. त्या वेळी कुंजीरवाडी परिसरात रस्ता ओंलाडणाऱ्या अन्नपूर्णा यांना भरधाव ट्रकने धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाविरुद्ध फिरोज रशीद (वय ३५, रा. खामगाव फाटा, यवत, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×