Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यातील महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना

उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या उपस्थितीत इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० चे उद्घाटन

marathinews24.com

पुणे – राज्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची संधी आणि व्यासपीठ मिळावे, यासाठी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इनोव्हेशन कौन्सिल लॅबची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शनिवारी केली.

“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या शहीदी वर्षानिमित्त विशेष टपाल प्रेझेंटेशन पॅकचे पुण्यात प्रकाशन – सविस्तर बातमी

इनोव्हेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० च्या उद्घटनाप्रसंगी डॉ. देवळाणकर बोलत होते. इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, एआयएसएसएमएस आयओआयटीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, टेकॅथॉन २.० चे विजेते गणेश खोसे, तेजस यादव, प्रा. देवेंद्र ईटोळे, नरेन्द्र गडगे, प्रणव वाडकर, विलास शिंदे, निकुंज ओव्हाळ आदी उपस्थित होते. यंदाच्या इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० मध्ये ४५० संघाचे १७०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले असून, ते पुढील २४ तास नावीन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करणार आहेत. या स्पर्धेला एआयएसएसएमएस आयओआयटीचे सहकार्य लाभले आहे.

डॉ. देवळाणकर म्हणाले की, आम्ही शिकताना अशा पद्धतीचे व्यासपीठ नव्हते. त्यामुळे आमच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना पुढे नेता आले नाही. इनोव्हेशन फाउंडेशनचा टेकॅथॉन हा उपक्रम विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्यासाठी एक चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. यातून समाजाभिमुख संशोधन आणि संशोधक घडत आहे. ही चळवळ अशीच पुढे जाण्याची गरज आहे. टेकॅथॉन किंवा एका दोन सारख्या उपक्रमांमध्ये मुख्यत्वे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी सहभागी होतात मात्र, पारंपारिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना कमी संधी मिळते. ही दरी भरून काढण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना आंतरविद्याशाखीय शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. त्यातच आता पुढे जात राज्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन कौन्सिल लॅब सुरू करण्याची प्रक्रिया लवकरच कार्यान्वित होईल. प्रचंड टप्प्यात उच्च शिक्षण संचालनाच्या अंतर्गत असणाऱ्या ११३२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये अशा लॅबची निर्मिती होईल आणि त्यानंतर विनाअनुदानित महाविद्यालयात अशा निर्माण करण्यासाठी मदत करण्यात येईल.

यादव म्हणाले की, पहिल्या इनोव्हेट यू टेकॅथॉनमध्ये विविध राज्यातील २३० संघ सहभागी झाले होते. आज हा प्रवास ४५० संगणक पर्यंत येऊन पोहोचला आहे. विद्यार्थी चळवळीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासोबतच ते सोडवण्याचे काम आम्ही करतो. त्याचवेळी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कशी विकसित होईल, याचाही विचार करणे गरजेचे आहे. ते अधिकाधिक लोकांना नोकरी देणारे कसे होतील, या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे होते. त्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.ही केवळ स्पर्धा नसून या माध्यमातून नाविन्यपूर्ण संशोधक आणि उद्योजक घडविण्याचा उद्देश आहे, असे यादव यांनी सांगितले.

डॉ. माने म्हणाले की, टेकॅथॉन ३.० ही राज्यातील क्रमांक एकची स्पर्धा असून, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्या नावीन्यपूर्ण संकल्पना घेऊन सहभागी झाले आहे. आपल्याला विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास न्यायचे असेल, तर त्यासाठी सामाजिक समस्या सोडविणारे संशोधक हवे आहेत. या स्पर्धेतून विकसित भारताची संकल्पना होण्यास हातभार लागणार आहे.

खोसे म्हणाले की, गेल्यावर्षीच्या टेकॅथॉन २.० मध्ये आम्हाला व्यासपीठ मिळाले. यातून आम्ही ॲक्वाड्रो प्रकल्पाच्या अंतर्गत पाण्यावर चालणारी दुचाकी विकसित करण्याची संकल्पना यशस्वीपणे मांडली आणि आता ती पूर्णत्वास नेण्याचे प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आम्हाला इनोव्हेशन फाउंडेशन आणि सरकारचे सहकार्य लाभले. त्यामुळे वर्षभरात आम्हाला १ कोटींपेक्षा व्यवसाय करता आला आहे. सूत्रसंचालन बालुशा माने यांनी केले. फाऊंडेशनचे सोहम म्हेत्रे, संकेत बारटक्के, सुरेश वेताळ, कौस्तुभ रेडेकर, निनाद फुटाणे आदींनी मोलाची भूमिका बजावली. बालुशा माने यांनी सूत्रसंचालन केले.

इनोव्हेट यू टेकॅथॉन हा उपक्रम राज्य पातळीवर

इनोव्हेट यू टेकॅथॉन हा उपक्रम राज्य पातळीवर नेण्याची गरज आहे त्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील प्रत्येक विभागीय स्तरावर अशा पद्धतीची स्पर्धा घेण्यात येईल. त्यातून निवडलेल्या चांगल्या संकल्पना आणि विजेत्यांना पुण्यात बोलवून सादरीकरणाची संधी मिळेल. त्यासाठी उच्च व त्यांचे शिक्षण विभागाचे इनोव्हेशन फाउंडेशनला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन डॉ. शैलेंद्र देळाणकर यांनी दिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×