Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

गॅस पुरवठा खंडीत करण्याची दाखवली भीती

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

महिलेची ६ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ५४ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला माॅडेल काॅलनीतील एका सोसायटीत राहायला आहेत. २ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ‘गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीतून बोलत असून, गॅस देयक थकीत आहे. त्वरीत थकीत देयक न भरल्यास गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल’,अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. त्यानंतर चोरट्यांनी गॅस देयकाची ‘एपीके फाईल’ महिलेच्या मोबाइलवर पाठविली. महिलेने ही फाईल उघडली. चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून सहा लाख तीन हजार रुपये लांबविले.
बँक खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वळविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमर काळंगे तपास करत आहेत. थकीत गॅस देयक, वाहतूक नियमभंगाची बनावट ‘एपीके फाईल’ पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×