शासकीय नोकरीच्या आमिषाने महिलेची १५ लाखांची फसवणूक

अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शासकीय नोकरीच्या आमिषाने एका महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अब्दुल सैफन बालगे (रा. बरुड, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठाकडील रोकड चोरली; रिक्षा चालक अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३१ वर्षीय महिला एरंडवणे भागात राहायला आहे. आरोपी बालगे हा महिलेचा ओळखीचा आहे. त्याने महिलेला महािला बाल विकास विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. महिलेकडून गेल्या दीड ते दोन वर्षात वेगवेगळी कारणे सांगून नोकरी लावण्याच्या आमिषाने १५ लाख रुपये घेतले. महिलेने त्याच्याकडे नोकरीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ सुुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×