Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

अखेर अझरुद्दीन शेखला अटक; तलाठी मारहाण, जातीवाचक शिवीगाळ प्रकरण

अखेर अझरुद्दीन शेखला अटक; तलाठी मारहाण, जातीवाचक शिवीगाळ प्रकरण

भिगवणमध्ये मुलीच्या अपहरण प्रकरणातही हात, कुटूंबियांचा आरोप

marathinews24.com

पुणे – भाजप आमदाराच्या जोरावर नागरिकांसह सरकारी कर्मचार्‍यांमध्ये दहशत दादागिरी निर्माण करणार्‍या स्वामी चिंचोलीतील आरोपीला दौंड पोलिसांनी गुरूवारी (दि.२६) अटक केली आहे. तलाठ्याला बेदम मारहाण करणे, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. अझरूद्दीन शौकत शेख (वय ३९, रा. शेख वस्ती, स्वामी चिंचोली, ता दौंड) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, भिगवणमधील मुलीच्या अपहरणाच्या कटात त्याचाच हात असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला होता.

नवीन क्रेडीट कार्डचा बहाणा, पावणेपाच लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

अवैध वाळूउपसा, माती उपसा रोखण्यासाठी कारवाई केल्याच्या रागातून आरोपी अझरूद्दीन शेख याने साथीदारांच्या मदतीने काही वर्षांपुर्वी तलाठ्याला बेदम मारहाण करीत शिवीगाळ केली होती. याप्रकरणी त्याच्यावर अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यातील काही आरोपींना अटक झाली होती. मात्र, भाजप आमदाराच्या जोरावर पोलिसांनी त्याला अटकही केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यानंतरही त्याने बेकायदा वाळू उपसार, मातीचोरी, झाडतोडी करून शासकीय मालमत्तेची चोरी केली. दरम्यान, याप्रकरणी आमदाराच्या नावाखाली सरकारी अधिकार्‍यांना दमदाटी करणे, माजी सरपंचांवर खुनी हल्ला करीत त्याने दहशत कायम ठेवली होती.

दरम्यान, भिगवणमध्ये मुलीचे अपहरण करणार्‍या दोघा भावडांचा अझरूद्दीन शेख हा नातलग आहे. मुलीचे अपहरण करण्यासाठी त्यानेच मदत केल्याचा आरोप मुलीच्या नातलगांनी केला होता. त्याला अटक करावी, आम्हाला न्याय मिळावा, यासाठी कुटूंबियासह विविध पक्षांनी भिगवण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यासोबत गावोगावी बंद पुकारण्यात आला होता. रस्त्यावर जाळपोळ करीत आंदोलनही केले होते. दरम्यान, मागील काही वर्षांत शेखविरूद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. तरीही दौंड पोलिसांनी त्याला अटक केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यानंतर पोलिसांवर दबाव वाढल्यामुळे मागील काही वर्षांपूर्वी तलाठ्यावर शेखने केलेल्या हल्ल्यात त्याला अटक केली.

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाहिजे आरोपी (वॉन्टेड) अझरूद्दीन शेख याला अटक केली आहे. यातील काही आरोपी यापूर्वीच अटक केले होते. दरम्यान, शेख हा पाहिजे आरोपी होता. त्याला शुकवारी आम्ही न्यायालयात हजर करणार असून, त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

-बापूसाहेब दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×