अग्निशमन दलाने आग विझवली
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती सदाशिव पेठेतील चव्हाण वाडा याठिकाणी लागलेल्या आगीने परिसरात खळबळ उडाली. रात्री आठच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तातडीने पाच अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. आगीचे कारण समजू शकले नाही.सुदैवाने घटनेत कोणतीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.
पुण्यात कोंबड्यांच्या झुंजीवर जुगारीचा पर्दाफाश – सविस्तर बातमी
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव पेठेत एकमजली असलेल्या वाड्यात चार कुटुंबे वास्तव्यास आहेत. रात्री आठच्या सुमारास छतावरून धूर व ज्वाळा दिसताच रहिवाशांनी तत्काळ बाहेर धाव घेतली. आगीची माहिती अग्निशमन दलाला कळवले. त्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात कोणी अडकल्याचे नाही याची खात्री करून, वाड्यातील ३ गॅस सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले.
जवानांनी २० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यानंतर कुलिंगचे काम सुरू ठेवले. दलाने आग इतरत्र पसरण्यापासून मोठा धोका टाळला. आगीत वाड्यातील घरगुती साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. मात्र, दुकानदारांनी वेळेवर मालाचा साठा बाहेर काढल्याने मोठे नुकसान टळले आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या तत्पर कार्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.




















