Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

डिजीटल अटकेच्या भीतीने जेष्ठ महिलेला २५ लाखांना लुटले

सायबर चोरट्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मनी लॉड्रींगच्या केसमध्ये डिजीटल अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ६९ वर्षीय महिलेला तब्बल २४ लाख ५० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १४ ते २४ ऑक्टोबर कालावधीत सोमवार पेठेत घडली आहे. याप्रकरणी महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि बँकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्ट टाइम नोकरीचे अमिष पडले साडेपाच लाखांना – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला सोमवार पेठेत राहायला असून, १४ ऑक्टोबरला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला होता. तुमच्या बँकखात्यातून मनी लॉड्रींग झाले असून, त्यामध्ये आम्ही तुम्हाला डिजीटल अटक करू शकतो, अशी भीती सायबर चोरट्याने जेष्ठ महिलेला दाखविली. तुमच्या बँकखात्यातील रकमेची पडताळणी करावी लागेल, असे सांगून सायबर चोरट्यांनी महिलेला रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. तब्बल २४ लाख ५० हजार रूपये पाठवूनही सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.

नागरीकांनो डिजीटल अटक करता येत नाही

नागरिकांनो सायबर चोरट्यांकडून तुम्हाला डिजीटल अटकेची भीती दाखवून बँकखात्याचा तपशील मागितला जाउ शकतो. अशा घटनेत आपल्या बँकखात्याची माहिती, पीनक्रमांक, गोपनीय माहिती कोणालाही देउ नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे. दरम्यान, कोणत्याही गुन्ह्यातील आरोपीला पहिल्यांना पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस बजावली जाते. त्यानंतर चौकशीत निष्पन्न झालेल्या माहितीनुसार पोलीस पुढील दिशा ठरवतात. त्यामुळे सायबर चोरट्यांच्या बतावणी भिउ नका, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×