माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या घरात सातारा पोलिसांची झडती
Marathinews24.com
पुणे – राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीप्रकरणात युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांना अटक आहे. याप्रकरणातील तक्रारदार महिलेला एक कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. मात्र, तक्रारदार महिला, पत्रकार खरात यांच्याशी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनात सांगितले होते. त्यानुसार गुरूवारी (दि ३ सातारा) पोलिसांनी देशमुख यांची कोरेगाव परिसरातील घरी धडक मारली. त्यांची तब्बल तीन तास चौकशी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणार्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते, असे सांगितले होते. त्याअनुषंगानेच सातारा पोलिसांनी देशमुख यांची चौकशी केली. तब्बल तीन तास चौकशी करून सातारा पोलीस मार्गस्थ झाले. दरम्यान, खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी नुकतेच महिलेला पकडले होते. संबंधित महिलेनेच मंत्री गोरे यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले होते. मात्र, यासर्व प्रकरणात स्थानिक पत्रकार तुषार खरात, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वारंवार संपर्क झाल्याचे उघडकीस आले होते. त्याच पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी देशमुखांची चौकशी केली आहे.
बनावट कंपनीकडून १०४ कामगारांच्या ‘पीएफ’ वर घोटाळा – सविस्तर बातमी
पत्रकारही अटकेत
रक्कम स्वीकारताना तक्रारदार महिलेला अटक करण्यात आली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील अटक केली आहे. या प्रकरणासंदर्भात सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्याकडे तपास केला आहे. त्यांच्याकडे नेमका कोणता तपास करण्यात आला,याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही.
संबंधित प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बर्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याबाबत आत्ता पोलीस तपास सुरू आहे. त्याबाबत बोलण्याविषयी माझ्याकडे खूप काही आहे पण मी आता बोलणार नाही. अजून तपास सुरू आहे पोलिसांना त्यांचा तपास करू द्या. त्यामध्ये जे काही आहे ते बाहेर येऊ द्या. – जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री