Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

शेअर ट्रेडींगच्या आमिषाने चार लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची फसवणूक

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला ३ लाख ९० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १७ जून ते ३ सप्टेंबर कालावधीत विश्रांतवाडीत घडली आहे. याप्रकरणी टिंगरेनगरात राहणार्‍या एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डाॅक्टरची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेविकेसह चौघांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विश्रांतवाडीतील टिंगरेनगर परिसरात राहायला आहेत. १७ जूनला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हॉटसअ‍ॅपद्वारे लिंक पाठविली. अ‍ॅप डाउनलोड करण्यास भाग पाडून गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार तक्रारदाराने गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. ३ लाख ९० हजारांची गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधिताला विचारणा केली असता, त्याने संपर्क बंद केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करीत आहेत.

पार्ट टाईमचे आमिष पडले सव्वा तीन लाखांना

पार्टटाईम नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी महिलेला तब्बल ३ लाख २३ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २८ ऑगस्टला वडगाव शेरीतील साईनाथनगरात घडली आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×