Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

केटरिंग कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली ११ लाखांची फसवणूक

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे बनावट मंजुरी पत्र देऊन फसवणूक

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सरकारी संस्थांमध्ये ओळख असल्याचे सांगत पुणे मध्यवर्ती कारागृहाचे केटरिंग कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाची ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हडपसरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी संग्राम पांडुरंग वाघ (वय ३१, रा. कुमार पिकासो, डी.पी. रोड, हडपसर) यांनी तक्रार दिली असून, प्रविण बाजीराव कांबळे (रा. हिमालय सीएचएस, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

अल्पवयीनांकडून वाहनांची तोडफोड, लोहगावमधील घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळेने तक्रारदाराशी ओळख वाढवून सरकारी संस्थांमध्ये मोठी ओळख असल्याचे भासवले. तसेच पुणे मध्यवर्ती कारागृहाचे केटरिंग कॉन्ट्रॅक्ट भागीदारीत घेण्याचा प्रस्ताव दिला. टेंडर भरल्यास कॉन्ट्रॅक्ट निश्चित मिळेल, तसेच आवश्यक सर्व परवानग्या आपल्या ओळखीमुळे सहज मिळतील, असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर आरोपीने तक्रारदाराकडून वेळोवेळी आरटीजीएस आणि रोख स्वरूपात ११ लाख रुपये उकळले. मात्र, कॉन्ट्रॅक्ट मिळवून देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. घेतलेली रक्कमही परत केली नाही. हा प्रकार आठ सप्टेंबर २०२३ ते २८ जून २०२५ या कालावधीत घडला आहे.याप्रकरणी १ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×