वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – वैद्यानीक क्षेत्रामध्ये मोठा हुद्दा प्राप्त करण्याच्या हेतुने बनावट कागदपत्रे तयार करून नवी दिल्ली येथील वैज्ञानिक एवं प्रौद्योगिकी मंत्रालयाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरेंद्रसिंह आसाराम यादव (रा. गुलमोहर पार्क, बकोरी फाटा, वाघोली, मुळ रा. के. आर. टीचर्स कॉलनी, न्यू प्रकाशनगर, जि. मथुरा, उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पराग रमेश चिटनविस (५७, रा. राष्ट्रीय रसायनीक प्रयोगशाळा कॉलनी, पाषाणरोड, सुसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ४ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला.
महंमदवाडी, कोंढवा, बिबवेवाडीत घरफोडी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. यादव याने २०२५-२६ या वर्षीचा एस.एस. भटनागर हा पुरस्कार जाहीर झालेले नवी दिल्ली येथील वैज्ञानिक एवं प्राद्योगिकीचे राज्य मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे बनावट हस्ताक्षर असलेले पत्र साथीदारांच्या मदतीने तयार केले. त्या आधारे वैज्ञानिक क्षेत्रामध्ये मोठा हुद्दा प्राप्त करण्याचा हेतुने वैद्यानिक एवं प्रौद्योगिी मंत्रालयाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या कॉलेजमध्ये घडला.
क्रेन भाडेतत्वावर हवे सांगून ५० हजारांना गंडा
खडकी मिलेट्री मधून बोलत असल्याची बतावणी करून तुमच्याकडून २० दिवसांकरीता भाडेतत्वार क्रेन पाहिजे असल्याचे फोनवरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर एक क्यूआर कोड पाठवून तो क्लिक करण्यात सांगितला. नंतर खात्यातून ५० हजार काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारक आनंदकुमार सिंग नावाच्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बाबासाहेब भिवा बजंग (३८, रा. टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३ सप्टेंबर रोजी दुपारी घडला.



















