संगम पुलाजवळ तरुणाला मारहाण करत लुटले होते, बंडगार्डन पोलिसांनी कामगिरी
Marathinews24.com
पुणे– गे-डेटींग अॅप’वरून लुटणार्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. कोणत्याही प्रकारचा पुरावा नसता, कौशल्यपुर्वक तपास करून पोलिसांनी टोळक्याला बेड्या ठोकल्या आहेत. वाजीद रज्जाक उर्फ लालसाहब शेख (वय १९), महेबुब ऊर्फ गौस जावेद शेख (वय २० ),श्रीनिवास उर्फ शिनु व्यकप्पा नायक (वय२२ ), सोहेल गफुर शेख (वय २४,सर्व रा. मंगळवार पेठ, पुणे) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
गे डेटींग अॅपवरून झालेल्या ओळखीतून पिंपरी परिसरात राहणार्या तरुणाला चौघांनी मारहाण करत लुटले होते. १८ मार्चला मंगळवार पेठेतील आरटीओ चौक परिसरातील मोकळ्या जागेत घटना घडली होती. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी तरुणाला धमकावून पैशांची मागणी करीत त्याला मारहाण केली होती. त्याच्याकडील डेबीटकार्ड, मोबाईल, गाडीची चावी काढून घेतली होती. त्यानंतर डेबीट कार्डचा पिन क्रमांक घेऊन एटीएमधून ९ हजार ५०० रुपये काढून घेतले. आरोपींनी परत फिर्यादीकडे १० हजार रुपयांची मागणी केली. परंतु त्याने देण्यास नकार दिला. दरम्यान, काही वेळाने शाहरूख परत तिथे आले. त्यानंतर चौघा आरोपींनी तरुणाला लाकडाने व हाताने बेदम मारहाण केली होती.
शेतकऱ्याकडून घेतली १ लाखाची लाच – सविस्तर बातमी
पोलिसांनी अशा ठोकल्या बेड्या
आरोपींनी तरुणाचा मोबाईल फॉरमॅट केला होता. त्यामुळे अॅपद्वारे संपर्क केलेली माहिती डिलीट झाली होती. शाहरुख हा एकच तपासाचा महत्वाचा धागा पोलिसांंकडे होते. पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, प्रदिप शितोळे,सारस साळवी आणि प्रकाश आव्हाड यांनी त्यांचा मोर्चा मंगळवार पेठेकडे वळविला होता. त्यावेळी त्यांना महेबुबची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने वाहीत, श्रीनिवास आणि सोहेल यांना बरोबर घेऊन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी टोळक्याला अटक केली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिपक निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र गायकवाड, गुन्हे निरीक्षक संपत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार यांच्या पथकाने केली.
अशी करत होते लूटमार
चौघे आरोपी एकाच टोळीचे असून, त्यातील महेबुब आणि सोहेल हेप्रमुख सुत्रधार आहेत. महेबुबच्या मोबाईलमध्ये त्या अॅपवर शाहरूख टॉप नावाने खाते तयार केले आहे. त्यावर फोटोही महेबुबचा आहे. मात्र समोरच्या व्यक्तीशी चॅटींग सोहेल करत होता.
अॅपच्या माध्यमातून संपर्क झाल्यानंतर सावज हेरत होते. सावज असे हेरत की बदनामीच्या भितीपोटी लुटल्यानंतरही ते कोठेही बोबाटा करणार नाही. सावजाला प्रथम महेबुब भेटत होता. त्यानंतर काही वेळानंतर वाहीद,श्रीनिवास आणि सोहेल घटनास्थळी जात होते. आरोपी सावज आणि महेबुब तरुणाला धमकावून जात होते. तरुणाला ब्लॅकमेल करून आम्ही तुझे व्हिडीओ तयार केले आहेत. फोटो काढले आहेत असे सांगून धमकावत होते. पैसे देण्यास नकार दिला तर मारहाण करुन लुटत होते. टोळीने ५० पेक्षा अधिक जणांना अशाप्रकारे लुटल्याचा अंदाज आहे. मात्र, बदनामीची भानगड मागे नको म्हणून त्यातील अनेकांनी तेरी भी चुप और मेरी भी चूप अशी भूमिका घेतली. मागील काही दिवसात पुणे शहरात असे चार प्रकार घडले होते.
तरुणाला लुटल्याप्रकरणी, बंडगार्डन पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यातील रोकड देखील जप्त केली आहे.– रविंद्र गायकवाड वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस ठाणे