Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

चार दरोडेखोर महिलांच्या टोळीला अटक

मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील मार्केटयार्ड परिसरात दरोडा टाकणार्‍या महिलांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना बुलढाणा परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे. सुनिता पिंटु सोळंकी (वय २२ ) मीना रवी सोळंकी (वय २३ ) बत्ती गणपत शिंदे ( वय २५) पुजा जगदेव सोळंके (वय २०) आईना अंकुश सोळंके ( वय २७ सर्व रा. मोहिदेपुर गाव, जळगाव जामोद, बुलढाणा) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे.

शेअर ट्रेडींगमधील गुंतवणूक पडली १५ लाखांना – सविस्तर बातमी

घरफोडी गुन्ह्याच्या अनुषंगाने मार्केटयार्ड पोलीस तपास करीत असताना उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांना आरोपी महिलांची माहिती मिळाली. तांत्रीक विश्लेषनाद्वारे आरोपी महिला मोहिदेपुर, जळगाव जामोद, बुलढाणा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक २१ नोव्हेंबरला रवाना करण्यात आले. उपनिरीक्षक सुनिल भापकर, राजेश थोरात, महेश जेधे, वनिता माने, धनश्री गोफणे, सरतापे, सचीन पवार यांचे पथक जळगाव जामोद याठिकाणी पोहोचले. स्थानिक पोलीस आणि पोलीस पाटील गोंविदा शिंदे यांच्या मदतीने आरोपी महिलांचा शोध सुरू केला.

आरोपी महिला सराईत असल्याने त्यांना गावात पोलीस आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे महिलांनी त्याठिकाणाहून पळून जात जंगलात लपून बसल्या होत्या. मार्केटयार्ड पोलिसांनी त्याठिकाणावरुन आरोपी महिलांना ताब्यात घेतले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक सुनिता नवले, उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे, उपनिरीक्षक सुनिल भापकर दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, आशिष यादव यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×