Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

न्यायासाठी घुले कुटुंबियांचे शोले स्टाईल आंदोलन

न्यायासाठी घुले कुटुंबियांचे शोले स्टाईल आंदोलन

पोलीसांच्या आश्वासनानंतर ७ तासाने आंदोलन मागे

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांच्या खून प्रकरणात नवनवीन घडामोडी घडत आहे. न्याय मिळावा यासाठी घुले कुटुंबियांनी चक्क पाण्याच्या टाकीवर चढून बुधवारी (दि.१ ) शोले स्टाईल आंदोलन केले. तब्बल सात तास आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर टाकीवर असलेले घुले कुटूंबीय खाली उतरले.

धक्कादायक…पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याने घेतला गळफास – सविस्तर बातमी 

न्यायाच्या मागण्यासाठी घुले कुटुंबियांनी बुधवारी सकाळी १० वाजता गावातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. आंदोलनात विलास घुले यांचे बंधू रमेश घुले,आई, पत्नी सहभागी झाले होते. घुले कुटुंबीयांनी पाच मागण्यासाठी तब्बल ७ तास आंदोलन केले. प्रकरणातील कटात सहभागी असलेल्या आरोपी सौरभ बजरंग सोनवणे यास तात्काळ अटक करण्यात यावी. सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अर्जदाराची व त्यांच्या कुटुंबाची सोशल मीडियावर होत असलेली बदनामी करणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी. खासदार बजरंग सोनवणे हे टी. व्ही. चॅनलच्या बाईटमध्ये अर्जदारास धमकीवजा बोलत आहेत; कदमवाडी येथील व सोनीजवळा येथील महिलांना माझे पाठबळ आहे असे सांगत आहेत.

त्यावरून त्यांचाही प्रकरणात असलेला सहभागाचा तपास करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. कदमवाडी येथील राजश्री कदम नावाची महिला युट्यूब चॅनल व अन्य टी. व्ही चॅनल वर अर्जदाराा विषयी बदनामीकारक व खोटे आरोप करत आहे त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. हे आंदोलन तब्बल सात तासानंतर सायंकाळी साडेपाच वाजता घुले कुटुंबियांकडून स्थगित करण्यात आले. घुले कुटुंबीयांनी केलेल्या मागणीवर पोलीस प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×