Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

धक्कादायक…पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याने घेतला गळफास

धक्कादायक...पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याने घेतला गळफास

केज तालुक्यातील कोरडेवाडीतील घटना

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – पेरणीसाठी पैसे नसल्याने नैराश्येत जाऊन २६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.०१) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोरडेवाडी (ता. केज) गावात घडली आहे. घटनेने कोरडेवाडी परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यात सिग्नल अन मुलीमुळे वाचला अनेकांचा जीव – सविस्तर बातमी 

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोसमी पाऊस सुरू आहे. शेतकरी पेरणीची लगबग करीत असताना बाबूराव सुभाष यादव (वय २६ ) या शेतकऱ्याला पेरणीसाठी पैसे नव्हते. पीक कर्जासाठी बॅंकेत वारंवार चकरा मारून सुद्धा त्यांना कर्ज मिळाले नाही. शेतकऱ्याने नैराश्येतून शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. यामुळे नागरिकांत तीव्र संताप निर्माण झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

संबंधित शेतकऱ्यांला वेळीच पीक कर्ज मिळाले असते तर अशी घटना घडली असती का? संबंधित शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार कोण? असे संतप्त सवाल परिसरातील शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत.संबंधित शेतकऱ्यांच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगी असा छोटासा परिवार आहे. त्यामुळे मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला मिळताच पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे .

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×