Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

पुण्यात सिग्नल अन मुलीमुळे वाचला अनेकांचा जीव

पुण्यात सिग्नल अन मुलीमुळे धक्कादायक...पेरणीसाठी पैसे नसल्याने शेतकऱ्याने घेतला गळफासअनेकांचा जीव

बाजीराव रस्त्यावरील झाडपड

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवती बाजीरावर रोडवर अवाढव्य झाडाची मोठी फांडी पडल्याची घटना बुधवारी (दि.१) दुपारी ३ वाजून २२ मिनीटांनी घडला. सुदैवाने अवघ्या काही सेकंदाच्या फरकामुळे लाल सिग्नल असल्यामुळे अनेकांचा जीव वाचला आहे. तर तरूणीने प्रवासासाठी रिक्षा चालकाला थांबवल्यानंतर क्षणात झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे दोन ते तीन सेकंदाचा फरक हुकला असता, तर मोठी जीवितहानी झाली असती, असे चित्र दिसून आले.

चेतन चैाधरीची लोहगडावर चौकशी – पोलिसांकडून पुन्हा ‘सीन रिक्रिएशन’ – सविस्तर बातमी 

संततधार पावसामुळे भिजलेल्या मोठ्या झाडाची फांदी कोसळल्याची घटना घडल्यामुळे बाजीराव रोडावरील वाहतूक पुर्णपणे बंद झाली. मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूच्या दुकानातील कामगारांसह व्यावसायिकांनी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमक दलाला माहिती दिल्यानंतर काही वेळातच जवानांनी पोहोचून झाड बाजूला काढण्यास प्राधान्य दिले. साधारपणे १५ ते २० मिनीटे परिसरातील वाहतूक टिळक रस्त्याने वठवण्यात आली होती. त्यामुळे त्याठिकाणीही गर्दी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, संततधार पावसाने मध्यवर्ती भागासह उपनगरात वाहतूकीचा वेग मंदावला होता. विशेषतः संध्याकाही सहावाजेनंतर वाहतूककोंडीत भर पडली होती.

३ वाजून २२ मिनीटे अन लाल सिग्नल

बाजीराव रोडवरील स्वामिनी भेळ सेंटरजवळ भलेमोठे झाड असून, मोठ्या उंचीवर झाडाच्या फांद्या आहेत. दरम्यान, बुधवारी दुपारी ३ वाजून २१ मिनीटांनी मध्यवर्ती सि-लाई चौकात लाल सिग्नल सुरू झाला. त्यामुळे बाजीराव रोडकडे जाणार्‍या वाहतूक बंद झाली. त्यानंतर अवघ्या एका मिनीटात झाडाची मोठी फांदी रस्त्यावर पडली. सुदैवाने वाहने नसल्यामुळे रहदारी नव्हती. परिणामी कोणीही जखमी अथवा वित्तहानी झाली नाही. त्यातच रस्त्यालगत थांबलेल्या तरूणीने रिक्षा चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला, त्याचक्षणी झाडाची फांदी पडली. त्यामुळे रिक्षा चालकाचाही जीव वाचला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×