हडपसरमधील घटनेने खळबळ
marathinews24.com
पुणे – शहरातील हडपसर परिसरात धक्कादायक घटनेत तरुणाने मैत्रिणीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजेरी लावली. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अनिता लोंढे (वय २७) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शिवाजी मिसाळ या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलवून मारहाण करुन लुटीचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिता आणि राहुल हे दोघे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंडलकरनगर, शेवळवाडी परिसरात एकत्र राहत होते. दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाल्याचे सांगितले जात असून, संतप्त राहुलने अनिताचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर आरोपी राहुल हा थेट यवत पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.