Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली सहवेदना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाही

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना

marathinews24.com

मुंबई – मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जूना पूल कोसळल्याची घटना धक्कादायक आहे. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याचे तसेच सुमारे २० ते २५ जण वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतानाच जखमींवर तातडीने उपचाराचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीने मदत व बचावकार्याला सुरुवात – उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

कुंडमळामध्ये ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत बचावकार्याला वेग देण्याचे, एनडीआरएफच्या तुकड्या, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि राज्यातील अशा जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच पर्यटनस्थळी विशेषता सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपातकालिन मदतीसाठीची यंत्रणा तत्पर ठेवावी अशा सुचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×