Breking News
कोथरूडमध्ये ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीकडून बंदबीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

कुंडमळा-मावळ पूल अपघात: प्रशासन आणि नागरिकांनी तात्काळ सुरू केली मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार

कुंडमळा येथे वेगवान बचावकार्यामुळे ५१ पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश

दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

marathinews24.com

मुंबई – मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना दुर्दैवी, वेदनादायी असल्याचे सांगत या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

हिंदुस्थानची जीवनशैली पर्यावरण पूरक- माजी केंद्रीय पर्यावरण, वनमंत्री प्रकाश जावडेकर – सविस्तर बातमी

दुर्घटनेत काही नागरिक व पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्थानिक प्रशासनाने तात्काळ दुर्घटनास्थळी पोहचून बचाव आणि मदतकार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलही (NDRF) दुर्घटनेनंतर अल्पावधीतच घटनास्थळी पोचले असून त्यांनीही बचाव व मदतकार्यास सुरुवात केली आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “कुंडमळा येथे स्थानिक प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केले आहे. जखमी नागरिकांना आवश्यक सर्व वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्याचे निर्देशित देण्यात आले आहेत. या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासन या संकटाच्या काळात बाधित नागरिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, जखमींना आवश्यक ती वैद्यकीय मदत शासनामार्फत तातडीने दिली जाईल. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा. आपण सर्वांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top