सोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रिय

खरेदीच्या बहाण्याने दागिने लांबविणारी टोळी सक्रीय

चंदननगर, वाघोलीत केली चोरी, गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्वेलर्समध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे दिसून आले आहे. अशाप्रकारे फसवणूकीच्या घटना वडगाव शेरी आणि वाघोली परिसरात घडल्या आहेत. संबंधित महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्या महिलांचा शोध घेतला जात आहे.

मॅफेड्रॉन तस्कराला बेड्या, १२ लाखांचे एमडी जप्त – सविस्तर बातमी

सोने खरेदीनिमित्ताने सराफी पेढीत आलेल्या एका महिलेने सेल्समनचे लक्ष विचलित करून दुकानातील ६० हजारांची सोन्याची अंगठी चोरून नेली. ही घटना १२ जूनला संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास वडगाव शेरीतील सावलिया ज्वेलर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तक्रारदाराने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपी महिलेचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार लिंगाण्णा तपास करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत तीन महिलांनी नाकातील सोन्याची चमकी खरेदी करण्याच्या बहाण्याने प्रवेश करून १६ हजार ५०० रूपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना १० जूनला संध्याकाळी चारच्या सुमारास वाघोलीतील पूना गाडगीळ ज्वेलर्समध्ये घडली आहे. याप्रकरणी ३० वर्षीय सेल्समनने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तीन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे तपास करीत आहेत.

अशी केली जातेय हातचलाखी

दागिने खरेदीच्या बहाण्याने महिलांची टोळी सराफी पेढीत शिरल्यानंतर सेल्समनचे लक्ष विचलित करते. विविध सोन्याचे दागिने पाहण्यासाठी मागितल्यानंतर आरोपी महिलांपैकी एकीकडून हातचलाखीने दागिने घेउन पसार होत लुट केली जात आहे. दरम्यान, गडबडीत सेल्समनकडून लक्ष न दिल्यामुळे महिलांकडून सराफी पेढीत लुटीच्या घटना वाढीस लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सराफी दुकानदारांमध्ये खळबळ उडाली असून, चोरट्या महिलांचा अटकाव करण्याची मागणी केली जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×