पुण्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आत्तापर्यंत पोलिसांकडून ३३ एन्काऊंटर
marathinews24.com
पुणे – शहरात गुन्हेगारीचा आलेख सुमारे ४० वर्षांपासून वाढत असल्याचे एन्काऊंटरवरून दिसून आले आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवत सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुण्यात पोलिसांची पहिला एन्काऊंटर लष्कर भागातील धोबीघाट परिसरात १९८३ मध्ये केला होता . त्यावेळी पोलीस अधिकारी सुरेंद्र पाटील, विनायकराव जाधव यांनी गुंड राजू हिसामुद्दीन शेख याला चकमकीत ठार मारले. त्यानंतर दत्तवाडीतील गुंड जग्या म्हस्के याला चकमकीत तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय टेमघरे यांनी ठार मारले होते.
सोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रिय – सविस्तर बातमी
कुख्यात गुंड अरुण गवळी टोळीतील गुंड किरण वालावलकर आणि रवी करंजावकर यांना पाेलीस उपनिरीक्षक सुरेश पोटे, टेमघरे यांनी एन्काऊंटर केले होते. २३ सप्टेंबर ९२ रोजी येरवड्यातील गुंड मेघनाथ शेट्टी याला पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जोशी, अजित जोशी यांनी चकमकीत ठार मारले.
तसेच प्रमोद माळवदकर याचा पिंपरीतील काळेवाडीत पोलीस उपनिरीक्षक राम जाधव, बापू कुतवळ यांनी चकमकीत ठार मारले. त्यानंतर रोहिदास येवले, राॅबर्ट साळवे, राहुल कंधारे, मोबीन शेख, रमेश तिवारी, तळेगाव दाभाडेतील श्याम दाभाडे, धनजंय शिंदे, देहूरोड भागातील गुंड राकेश ढोकलिया उर्फ महाकाली यांंना चकमकीत ठार केले.
शेख दाम्पत्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा
पोलिसांवर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुंड शाहरुख शेख आणि त्याची पत्नी नफिसा यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोहोळ पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली.
गुंडांना शरण येण्याचे आवाहन, अन्यथा पोलिसांचा इशारा
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक गुंड शाहरुख शेखला पकडण्यासाठी लांबोटी गावातील त्याचा नातेवाईक राजू शेख याच्या घरी रविवारी दि. १५ जूनला पहाटे पोहोचले. पोलिसांनी शाहरुखला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने त्याच्याकडील पिस्तूल पोलिसांवर रोखले. पोलिसांनी त्यााल शरण येण्याचे आवाहन केले. त्यावेळी खोलीत तीन लहान मुले होती. शाहरुखने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याला पुन्हा शरण येण्याचे आवाहन केले. घरात लहान मुले असल्याने गंभीर घटना घडण्याची शक्यता होता. पोलिसांच्या पथकाने प्रसंगावधान राखून प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबार शाहरुख जखमी झाला. उपचारासाठी त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.