Breking News
बीडीपी आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलावित – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेशहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाडराज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईत १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्तमातंग समाजाच्या स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार…एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांची फसवणूकCrime News : धक्का लागल्याच्या वादातून टोळक्याकडून एकाचा खूनCrime News : बालेवाडीत महिलेचे दागिने हिसकावलेबाणेर-बालेवाडी वाहतूक समस्यांबाबत उच्चस्तरीय बैठक : तातडीने उपाययोजनांचे आदेशकोथरुड मध्ये वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॅार्डनची नियुक्ती करा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देशपिंपरीत ‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमने पथनाट्य सादर करत केली स्वच्छता विषयक जनजागृती

कडबनवाडीत जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन

marathinews24.com

पुणे – राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशामध्ये जिप्सीमधून करण्यात येणाऱ्या सफारी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नागरिकांनी या सफारीचा लाभ घेण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते,सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे, इंदापुरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री ठाकूर आदी उपस्थित होते.

शिक्षणात योग्य नियोजनासह सातत्यावर यश अवलंबून-अरुण ठाकूर – सविस्तर बातमी

भरणे यांच्या हस्ते पुणे वनविभागाकडून एकूण ३ जिप्सीधारकांना प्रत्येकी १ लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले तसेच कडबनवाडी गवताळ प्रदेशाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.
मंत्री भरणे यांनी कडबनवाडी येथील गवताळ प्रदेशाचे स्वतः सफारी केली. नागरिकांनीही या सफारीचा आनंद घेऊन याबाबत इतर नागरिकांपर्यंत माहिती पोहचवावी, असे आवाहन भरणे यांनी केले.

यावेळी कडबनवाडी वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जलभूषण भजनदास पवार, सदस्य दादासाहेब जाधव, सरपंच संगिता गावडे, उपसरपंच कडबनवाडी, ऍड. सचिन राउत, फ्रेंडस ऑफ नेचर क्लब, निमगाव केतकी व त्यांचे सदस्य आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top