Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

‘दगडूशेठ’ तर्फे २७ हजार वारक-यांची आरोग्य व नेत्र तपासणी

'दगडूशेठ' तर्फे २७ हजार वारक-यांची आरोग्य व नेत्र तपासणी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन; तब्बल ११ हजार ५०० चष्मे वाटप

marathinews24.com

पुणे – रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जय गणेश प्रांगण येथे वारक-यांसाठी आयोजित आरोग्य व नेत्र तपासणी शिबीरात २७ हजार ५६४ हून अधिक वारक-यांची तपासणी करण्यात आली. तसेच मंदिर परिसरात तब्बल २५ हजार वारक-यांना सकाळचा नाश्ता व चहा देखील देण्यात आला.

बार्टी आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या संयुक्त उपक्रमातून १५० अनुसूचित जातीच्या तरुणांना कौशल्य विकास प्रमाणपत्रे – सविस्तर बातमी 

आरोग्य शिबीर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ घोडके, राजाभाऊ सूर्यवंशी, रुणाल केसरकर, प्रदीप ढवळे, मनोज वाळुंजकर, सुनील जाधव, विजय कोंढाळकर, ट्रस्टचे वैद्यकीय विभाग प्रमुख राजेंद्र परदेशी तसेच सुवर्णयुग तरुण मंडळ आणि सुवर्णयुग सहकारी बँकेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ट्रस्टच्या आरोग्यसेवेच्या कार्यात वारक-यांसाठी आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर हा एक भाग आहे. या आरोग्य शिबीरात डोळ्यांची तपासणी, ११ हजार ५०० भाविकांना चष्मेवाटप यांसह वारक-यांना प्रवासा दरम्यान येणा-या विविध आरोग्यविषयक अडचणींची तपासणी करण्यात आली. अंगदुखी, डोकेदुखी, बीपी, शुगर यांसारख्या आजारांवर विनामूल्य औषधे देखील देण्यात आली. अंगदुखी, पाठदुखी साठी अ‍ॅक्युप्रेशर थेरपी, प्रथमोपचार देखील करण्यात आले. तसेच ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांना विनामूल्य शस्त्रक्रिया करुन देण्यात येणार आहे. शिबीरात डॉक्टर व स्वयंसेवक मिळून २७५ जणांनी सहभाग घेतला.

शिबीरात सत्यसाई सेवा आॅर्गनायझेशन, तेजोमयी आय केअर, रेणुका नेत्रालय, सूर्य सह्याद्री हॉस्पिटल कसबा पेठ, सद्गुरु शंकर महाराज मठ अन्नछत्र समिती, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, देशपाडे आय केअर कोथरुड आदी संस्थांनी सहभाग घेतला. यापुढेही ट्रस्टतर्फे विविध मोफत आरोग्य शिबीरे घेण्यात येणार असून सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच पुण्यामध्ये पालख्यांचे आगमन होताना मंदिरासमोर पालख्यांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×