Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

अपघाताकच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तत्काळ कार्यवाहीची गरज – डॉ. नीलम गोऱ्हे

नवले पूल परिसर दुर्घटना पीडित कुटुंबीयांची गोऱ्हे यांनी घेतली भेट

marathinews24.com

पुणे – शहरातील नवलेपूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांची विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत नवलकर आणि दाभाडे कुटुंबीयांशी संवाद साधताना एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावरील झालेला प्रचंड आघात आणि त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे ही घटना अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातानंतर मदत करत असल्याचे भासवून काही लोकांनी मृतांच्या आधार कार्ड, मोबाईल फोन, दागिने महत्वाच्या कागदपत्रांची चोरी केली आहे. याबाबत पोलीस आयुक्तांना तातडीने दखल घ्यावी असेही त्यांनी नमूद केले.

कनेक्टिंग ट्रस्टतर्फे नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय परिषद – सविस्तर बातमी

भेटीत त्यांनी स्थानिक अधिकार्‍यांना देखील उपस्थित राहण्याचे सांगितले होते, जेणेकरून नुकसानभरपाई, पुनर्वसन आणि शासकीय मदतीबाबत तत्काळ माहिती व दिशा मिळू शकेल. तरीही मानसिक धक्का मोठा असल्याने अशा दुर्घटनातील आर्थिक मदतीतून दुःख भरून निघणे शक्य नाही. त्यामुळे अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना बाबत गंभीर होणे आता अत्यावश्यक झाले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याबाबत कळविले आहे. या निवेदनात त्यांनी नवले पुलावरील धोकादायक उतारात तातडीने बदल, पर्यायी वाहतुकीची सोय, कात्रज बोगद्यापासून न्यूट्रलवर उतरणाऱ्या वाहन चालकांसाठी विशेष जनजागृती, उतारावर वेग नियंत्रणाचे तांत्रिक उपाय तसेच जड वाहनांची तपासणी इत्यादी आवश्यक उपाययोजना करणेबाबत नमूद केले आहे. याशिवाय या स्थळी वारंवार घडणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी उपाय योजना सुचविणे व त्याच्या अंमलबजावणी कामी मुंबईत लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले.

“सरकारची मदत लवकरच मिळेल, असे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. मात्र याचबरोबर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेनेच्या वतीने आम्ही तातडीची आर्थिक मदत स्वतः दिली आहे,” असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. भेटीत पुणे युवा सेना शहर प्रमुख निलेश गिरमे, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश घारे आणि युवासेना प्रमुख सोमनाथ कुटे, कार्यकर्ते लोकेश राठोड, हृतिक गलांडे व चेतन कोद्रे हे उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्यावतीने मंडळ अधिकारी श्रीमती अर्चना ढेंबरे यादेखील उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी मृत स्वाती नवलकर यांच्या पती संतोष नवलकर तसेच त्यांचा मुलगा आणि मुलगी यांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच मृत दत्ता दाभाडे यांच्या मुलगी कोमल दाभाडे यांनाही भेट देत त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला. त्यांनी दिलेल्या निवेदनाची प्रतही कुटुंबीयांना देण्यात आली असून या प्रकरणात केंद्र सरकार,महाराष्ट्र शासन,स्थानिक प्रशासन यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा उपस्थित केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×