Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वीपणे राबवा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार ; ९६ तासांत होणार घरपोच

देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान

marathinews24.com

पुणे – केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे, सर्व संबंधित विभागाने समन्वय साधून हे अभियान यशस्वी करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

राजकीय स्वार्थासाठी भावनांचा गैरवापर नको – भाऊसाहेब आंधळकर – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानानंतर्गत २ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्याबाबत आढावा घेतला.

कदम म्हणाल्या, जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येत आहे. या अभियानानंतर्गत दुसरा टप्पा ९ ते १२ ऑगस्ट २०२५ तर तिसरा टप्पा १३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागाने अभियानाची अंमलबजावणी करावी, अशा सूचना श्रीमती कदम यांनी दिल्या. यावेळी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×