Breking News
Sugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहनPune Solapur Road Accident : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यूPune Crime News : सराफी पेढीच्या भिंतीला छिद्र पाडून चोरीChakan Industrial Area Development : प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून चाकण औद्योगिक क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावाSrinagar Dussehra Celebration : श्रीनगरमध्ये दसऱ्याचा उत्साह; सामाजिक सलोख्याचे दर्शन

शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन व २०७० पर्यंत ‘नेट-झिरो’साठी पुढाकार

आरती अहिवळे यांची माहिती; ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल व ईपीडी ग्लोबल यांच्यात आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार

marathinews24.com

पुणे – शाश्वत विकास, पर्यावरणाचे संवर्धन, कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यासह २०७० पर्यंत भारताने ठेवलेले ‘नेट-झिरो’चे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी प्रयत्नशील आहोत. हरित व पर्यावरणपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी पुणेस्थित ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल व नॉर्वेस्थित ईपीडी ग्लोबल यांच्यातील भागीदारी महत्वपूर्ण ठरेल. शाश्वत विकासासाठी घेतलेला हा पुढाकार आहे,” अशी माहिती ग्रीन सोल्यूशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे आणि आरती भोसले-अहिवळे दिली.

संविधान दिनानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन – सविस्तर बातमी

ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल आणि ईपीडी ग्लोबल यांच्यामध्ये पर्यावरणीय उत्पादन घोषणेची ( एन्व्हायर्नमेंटल प्रॉडक्ट डिक्लेरेशन-ईपीडी) सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक करार करण्यात आला. ईपीडी ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकॉन हाऊआन आणि ‘ग्रीनएक्स’चे सागर अहिवळे व आरती भोसले-अहिवळे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पिटके उपस्थित होते. तीन वर्षांकरीता हा करार झाला असून, भारतीय उद्योगसमूहांनी तयार केलेल्या उत्पादनांचे पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण ईपीडी ग्लोबलमार्फत अधिकृतपणे ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल करणार आहे. संबंधित उत्पादनाचा ईपीडी दस्तऐवज त्या उत्पादनावर, तसेच उत्पादकाच्या संकेतस्थळावर ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

आरती भोसले-अहिवळे म्हणाल्या, “या सहकार्यातून ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल भारतातील ईपीडी जनरेशन सेवांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहे. यामुळे देशभरात पर्यावरणीय उत्पादन विस्ताराला गती मिळणार आहे. शाश्वत विकास, पर्यावरणीय पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरण अहवाल व मानदंड यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या दोन्ही संस्था एकत्र येत आहेत. या उपक्रमातून भारतात अधिक जबाबदार, हरित आणि नवोन्मेषी उद्योगसंस्कृती घडविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ग्रीनएक्सने गेल्या काही वर्षांत रसायने, अभियांत्रिकी, धातू, अन्न उद्योग अशा विविध क्षेत्रांतील ५० पेक्षा अधिक व्यवसायांसोबत ईपीडी प्रकल्प राबविले आहेत. ईपीडी ग्लोबलसोबतचा करार भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तराचा दर्जा उपलब्ध करून देईल आणि प्रमाणपत्रांच्या खर्चात सुमारे ७० टक्के घट होईल.”

सागर अहिवळे म्हणाले, “भारतातील छोट्या-मोठ्या उद्योगांचे जागतिक बाजारातील प्रदर्शन उल्लेखनीय आहे. ईपीडी असलेली उत्पादने जगभरात अधिक प्राधान्याने स्वीकारली जात आहेत. त्यामुळे भारतीय एमएसएमई उत्पादकांना निर्यात वाढविण्यास आणि चांगला दर मिळविण्यास याचा मोठा फायदा होईल. पारदर्शकता वाढवणे, शाश्वततेकडे वाटचाल सुलभ करणे आणि जागतिक बाजारपेठेच्या निकषांनुसार स्वतःला सिद्ध करणे, हा या सहयोगाचा प्रमुख उद्देश आहे. सध्या ईपीडी अनिवार्य नसली तरी पर्यावरणीय परिणाम कमी करण्यासाठी जगभरातील सरकारे त्यावर भर देत आहेत. आगामी काळात हा आवश्यक निकष ठरणार आहे.”

ही भागीदारी भारतासह संपूर्ण प्रदेशातील शाश्वतता क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. उद्योगांची स्पर्धात्मकता वाढविणे, रोजगारनिर्मितीला चालना देणे आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब वेगवान करणे, यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. भारताच्या २०७० पर्यंत ‘नेट झिरो’ ध्येयाच्या पूर्ततेसाठीही ही भागीदारी अर्थपूर्ण योगदान देणार आहे. पुणे, मुंबई, गुजरात आणि दुबई येथे ग्रीनेक्सची कार्यालये असून, देशातील इतर प्रमुख १० पेक्षा अधिक औद्योगिक शहरांत विस्तार करण्यात येणार आहे. १०० पेक्षा अधिक पर्यावरणीय सल्लागार, तसेच या प्रक्रियेशी संबंधित मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार आहे,” असे सागर अहिवळे यांनी नमूद केले.

भारतीय उद्योगांना पर्यावरणीय उत्पादन घोषणेची ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटलसोबत झालेला हा करार महत्वाचे पाऊल ठरेल. भारतात आमच्या सेवा विस्तारण्यासाठी ‘ग्रीनएक्स’च्या स्वरूपात एक विश्वासू सहकारी आम्हाला मिळाला आहे. या दोन्ही संस्थांची भागीदारी भारतीय उद्योग क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.
– हॅकॉन हाऊआन, मुख्य कार्यकारी अधिकारी, ईपीडी ग्लोबल नॉर्वे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×