घायवळ बंधूचा शोध लागेना; पुणे पोलीस हतबल

घायवळ बंधूचा शोध लागेना; पुणे पोलीस हतबल

तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उभे

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ बंधूंनी गेल्या तीन महिन्यांपासून पुणे पोलिसांचा घाम काढला आहे. अद्याप देखील ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे तपास यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कोथरूडमधील दोन तरुणांवर झालेला खुनी हल्ला तसेच, खंडणीच्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी नीलेश घायवळ याच्या व्हिसाची मुदत संपून १० दिवस उलटले असले तरी त्याचा माग पोलिसांना लागला नाही. तसेच या गुन्ह्यांमधील सहआरोपी सचिन घायवळ याचा सुद्धा अद्याप ठावठिकाणा पोलिसांना लागलेला नाही.

पुण्यात एमडी विक्री रॅकेटचे राजस्थान कनेक्शन – सविस्तर बातमी 

लंडनला पसार झालेला कुप्रसिद्ध गुंड नीलेश घायवळ आठवडाभरापूर्वी पुण्यात दाखल होणे अभिप्रेत होते. मात्र, तो तेथेच वास्तव्यास आहे की, अन्य देशात फरार झाला आहे याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही. आंतराष्ट्रीय पातळीवर एखाद्या गुन्हेगाराला त्याच्या मायदेशात घेऊन यायाचे असल्यास वेगवेगळे कायदे, नियम आहेत. त्या अनुषंगाने पुणे पोलिस गेल्या काही महिन्यापासून प्रयत्न देखील करत आहेत. परंतू अद्याप त्यांना निलेश घायवळ याला भारतात परत आणण्याच्या दृष्टीकोणातून यश आलेले नाही. तर निलेश याचा भाऊ सचिन याच्या शोधासाठी पोलिसांनी नगर तसेच मराठवाडा परिसर पिंजून काढला. महिन्याभरापूर्वी तो जामखेड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचला. मात्र, पोलिसांना गुंगारा देऊन सचिन पसार झाला. घायवळ बंधुंना कोण्या राजकीय नेत्याने आश्रय दिला आहे किंवा कसे याबाबत पोलीस वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

कोथरूडमध्ये किरकोळ भांडणातून १७ सप्टेंबर २०२५ ला दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामध्ये पिस्तूल, चॉपर व अन्य घटक शस्त्रांचा वापर करण्यात आला. मात्र, त्याचकाळात नीलेश विदेशात पसार झाला. त्याचा भाऊ सचिन यानेही दडी मारली. नीलेशचा मुलगा लंडनमध्ये शिक्षण घेतो. त्यामुळे, तो तेथे गेला असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली. त्याच्या प्रत्यार्पणासाठी गृह मंत्रालयाने यापूर्वीच रेड कॉर्नर व ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली आहे. तसेच, त्याचा नेमका ठावठिकाणा समजण्यासाठी पुणे पोलिसांनी ब्रिटिश उच्चायुक्तांशीही पत्रव्यवहार केला. त्यानंतर, त्याचा लंडनमधील नेमका ठावठिकाणा पोलिसांना समजला. त्याच्या व्हिसाची मुदत गेल्या आठवड्यात ( दि. ६) संपली. तसेच यापुर्वी त्याचा पासपोर्ट देखील रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे, तो पुण्यात दाखल होण्याच्या शक्यतेने पोलिसांनी देशातील महत्वाच्या विमानतळांवर त्याची माहिती देऊन तेथेच त्याला ताब्यात घेण्याची व्यवस्था केली. मात्र, त्याच्याबाबत नेमकी माहिती अद्यापपणे पुढे आलेली नाही.

कोथरूडमधील दोन तरुणांवरील हल्याप्रकरणी नीलेश व सचिन या घायवळ बंधुंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दोघे वगळता या गुन्ह्यातील अन्य सहा आरोपीना अटक करण्यात आली. त्याबाबत पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. तत्पूर्वीच सचिन हा ही पसार झाला. त्याच्याविरुद्ध एका महिलेकडून चाळीस लाखांची खंडणी उकळल्याचा तसेच एका बांधकाम व्यावसायिकाकडून दहा फ्लॅट बळकावल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश घायवळच्या पासपोर्टचे गौडबंगाल कायम

खून, खुनी हल्ले, खंडण्या उकळणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या कुप्रसिद्ध गुंड नीलेश घायवळ याने अहिल्यानगरमधून बनावट कागदपत्रांच्याआधारे पासपोर्ट मिळवला असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. पोलिस तपासात त्याने आपल्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर येऊ नये म्हणून नावात बदल केल्याचे पुढे आले.

सचिन घायवळचा शस्त्र परवाना वादग्रस्त

गुंड नीलेश घायवळ याला पासपोर्ट देण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच त्याचा भाऊ सचिन याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या अहवालनानंतरही गृह मंत्रालयाने त्याला पिस्तुलाचा परवाना दिल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. त्यासाठी एका बड्या राजकीय नेत्याने शिफारस केल्याची चर्चा आहे. त्याबाबत काही आजी माजी मंत्र्यांतर्फे आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र, संबंधित नेत्याचे नाव गुलदस्त्यात राहिले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×