Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

प्रवाशांचे मोबाईल हिसकावणाऱ्या सराईताला पकडले

३ गुन्हे आले उघडकीस

marathinews24.com

पुणे – शहरातील पुणे रेल्वे स्टेशनसमोरील शिंदे वाहन तळासमोरील कात्रज बस स्टॉपकडे चालत जात असलेल्या प्रवाशाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या सराईत चोरट्याला बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २ मोबाईल आणि मोटार सायकल असे ३ गुन्हे उघडकीस आणून ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अर्जुन हिराजी भोसले ( वय २३, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यावर पुणे शहरात यापूर्वी विविध ठिकाणी ९ गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार पळून गेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शिरून पदाधिकाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रविशंकर बंडप्पा खुबा ( वय ३१, रा. कात्रज चौक, कात्रज) हे ३ नोव्हेंबरला पहाटे पाचच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनसमोरील शिंदे वाहन तळाकडून समोरील कात्रज बस स्टॉपकडे जात होते. त्यावेळी भावाला फोन करण्यासाठी त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढला. त्यावेळी दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. ते बोल्हाई चौकाच्या दिशेने निघून गेले. बंडगार्डन पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात खुबा यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांनी विना नंबरप्लेटची मोटार सायकल वापरल्याचे दिसून आले. त्यावरून मिळालेल्या वर्णनाच्या चोरट्यांचा शोध घेत असताना त्यांना विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून एकजण जाताना दिसला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याच्याकडील मोटार सायकल ही राजगड पोलिस ठाण्यातून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. हरीश रतनलाल पटेल (२०, रा. मोहननगर, धनकवडी) हे ३ नोव्हेंबर रोजी पहाटे पुण्यात आले होते. पुणे स्टेशवरून ते स्वारगेटला आले. स्वारगेट बस स्थानकाबाहेर पहाटे साडेचारच्या सुमारास ते मित्राला फोन करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला होता. स्वारगेट येथून मोबाईल चोरल्यानंतर ते पुणे स्टेशनला आले. तेथे त्यांनी दुसरा मोबाईल हिसकावून घेतला होता. बंडगार्डन पोलिसांनी हे दोन मोबाईल आणि मोटारसायकल असा ७० हजाराचा माल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, एसीपी संगिता आल्फासो शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×