Breking News
ऑस्ट्रेलियासह पुण्यातही मानसिक व शारीरिक त्रासाचा सामना…क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादनपुरस्कार विजेत्यांनी खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसक्रीडासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनपिंपरी-चिंचवड; दारूच्या नशेत बरळला अन खुनाची उकल झाली !सावकरासोबत पत्नीचे झेंगाट जुळले…मांजरी बुद्रूक परिसरात घरफोडी, ५ लाखांचा ऐवज लंपासशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिष, दोघांची ६२ लाखांची फसवणूकपुणे : वर्दळीच्या मार्केटयार्ड परिसरात वाहतूक बदलपिस्तुलासह काडतुस बाळगणार्‍या इसमास बेड्या

जलयुक्त शिवार अभियान; शिवारफेरीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

जलयुक्त शिवारासाठी गती द्या; शिवारफेरीचे काम १५ मेपूर्वी पूर्ण करा; जिल्हाधिकारी डूडी यांचे निर्देश

Marathinews24.com

पुणे – जलयुक्त शिवार अभियानाच्या अनुषंगाने शिवारफेरीचे काम १५ मे पर्यंत पूर्ण करावे. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ सहभागी करुन घ्यावे. नवीन, दुरूस्तीची कामे योजनेत समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे आढळून आले, त्यांच्याबाबत सविस्तर नोंदी घेऊन अंदाजपत्रके तयार करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार बाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे वनविभागाचे उप वनसंरक्षक महादेव मोहिते, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले 7 ठळक निर्णय – सविस्तर बातमी

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, शिवार फेरीमध्ये प्रत्यक्ष गावात भेटी देऊन नोंद असलेल्या मृद व जलसंधारण संरचनांची स्थळ पडताळणी करून नोंद नसलेल्या मात्र नव्याने आढळलेल्या संरचनांची नोंद केली जाणार आहे. पडताळणी व नोंद केल्यानंतर सद्यस्थिती व उपयुक्ततेबाबत माहिती मोबाईल ॲपमध्ये अचूकपणे भरण्याचे काम करावे. लघुसिंचन योजनांची ७ वी प्रगणनाही शिवारफेरीच्या वेळीच करून घ्यावी.
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या ६८ लाख ६६ हजार घन मीटर गाळ काढण्याच्या २२० कामांना प्रशासकीय मान्यता तात्काळ द्यावी. जसजसे प्रस्ताव प्राप्त होतील तसतशी गतीने प्रशासकीय मान्यता द्यावी. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या अशासकीय संस्थांची यंत्रणा ज्या तालुक्यात अधिक आहे अशा ठिकाणी त्यांना कामे द्यावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. अटल भूजल योजनेंतेर्गत नळपाणी पुरवठा योजनांच्या स्रोतांचे बळकटीकरणाची कामे हाती घ्यावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जलयुक्त शिवार अभियान २.० मध्ये सर्व विभागांच्या मिळून ५६ कोटी ३७ लाख रुपयांच्या एकूण ५ हजार ४५५ कामांना आराखड्यास मान्यता देण्यात आली. लेखाशीर्षांतर्गत हाती घेतलेल्या ७९५ पैकी ७४३ कामे पूर्ण झाली असून उर्वरित प्रगतीत आहेत. अभिसरणातील ४ हजार ५५३ कामे पूर्ण झाली असून ५२ कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या १०० दिवस कृती कार्यक्रमादरम्यान या अभियानातंर्गत ५३१ कामांपैकी ३८७ पूर्ण झाली असून उर्वरित सुरू आहेत, असे सांगण्यात आले.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, व नाला खोलीकरण अंतर्गत ४७ कोटी ७७ लाख रुपयांच्या १९६ कामांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी १३४ कामे पूर्ण झाली असून २९ लाख घनमीटर गाळ काढला आहे. यामध्ये १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत हाती घेतलेल्या १३८ पैकी १०० कामे पूर्ण झाली असून २० प्रगतीपथावर आहेत, अशीही माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीत अमृत सरोवर योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक २.० जलशक्ती अभियान- कॅच द रेन (जल संचय जन भागिदारी) आढावा घेण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top