पुण्यात देखावे पाहणाऱ्या महिलांचे दागिने लांबविले

पुण्यात देखावे पाहणाऱ्या महिलांचे दागिने लांबविले

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – शहरात गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे दागिने चोरट्यांंनी लांबविल्याची घटना घडली. हुतात्मा बाबू गेनू चौक, तसेच तुळशीबागेत या घटना घडल्या. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला नगर रस्त्यावरील वाघोली भागात राहायला आहेत. त्या हुतात्मा बाबू गेनू चौकातून निघाल्या होत्या. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. पोलीस कर्मचारी इनामदार तपास करत आहेत.

पुण्यात सिलेंडरमधुन गॅसची चोरी करणार्‍या टोळीला अटक – सविस्तर बातमी 

तुळशीबागेत एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी (४ सप्टेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्या गुरुवारी तुळशीबागेत देखावा पाहण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस कर्मचारी कदम तपास करत आहेत.

ओैंध रस्त्यावरील दोन दुकानांतून रोकड लांबविली

औंध रस्त्यावरील दोन दुकानांचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी २१ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका दुकानदाराने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांचे ओैंध रस्त्यावरील शततारका अपार्टमेंटमधील तळमजल्यावर ओैषध विक्रीचे दुकान आहे. चाेरट्यांनी ओैषध विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील १९ हजार १८० रुपयांची रोकड लांबविली. शेजारी असलेल्या एका दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील ११०० रुपयांची रोकड लांबविली. पोलीस कर्मचारी भुजबळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×