हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – कुटुंबियांसह घराच्या मुख्य दरवाजाला असलेले डिजिटल लॉक करून बाहेर गेलेल्या तरुणाच्या घरातील २६ लाख ६७ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरांनी चोरून नेले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने १९ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल शिंदे (३३, रा. असेन्ट टॉवर, ॲमेनोरा पार्क टाऊन, हडपसर) हे शनिवारी (दि. ११) संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाला असलेले डिजिटल लॉक करून कुटुंबियांसह घराबाहेर गेले होते. रविवारी (दि. १२) दुपारी तीनच्या सुमारास ते घरी परतले असता, त्यांना डिजिटल लॉक उघडल्याचे निदर्शनास आले. घरात जाऊन त्यांनी पाहणी केली असता, चोरांनी डिजिटल लॉक उघडून बेडरूममधील पलंगामध्ये ठेवलेले २६ लाख ६७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला केल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी हे करत आहेत.




















