कारगिल विजय दिनी ‘कर्मयोध्दे’चे प्रकाशन

माजी सैनिक संघटनेचा शौर्याला सलाम

marathinews24.com

पुणे – भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वार्षिक विशेषांक ‘कर्मयोध्दे’चे प्रकाशन महाराष्ट्रभरात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. २६ जुलैला विशेषांक ‘कर्मयोद्धे’चे प्रकाशन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, दत्ता भरणे , संघटनेचे पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून सदर्न कमांड चे प्रमुख धीरज सेठ यांना,सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य चे संचालक निवृत्त कर्नल दीपक ठोंगे यांना संघटनेची माहिती आणि हा विशेषांक देण्यात आला.

‘म्हणती ज्ञानदेव’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध – सविस्तर बातमी

हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे कार्यकारी संपादक व पुणे विभागीय उपाध्यक्ष प्रकाश भिलारे , मोहिते, पुणे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, माजी सरचिटणीस बाळासाहेब जाधव, राज्य सल्लागार दिलावर शादीवान, कारगिल योद्धे व आजीवन सदस्य गवळी व सदस्य उपस्थित होते. सातारा येथे माननीय सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व उपसंचालक ले. कर्नल हंगे तसेच सातारा जिल्हाध्यक्ष नवनाथ इंदलकर विभागीय सचिव संजय बोराटे, इंदूर , तांदळे , मतकर, घाडगे यांनी परिश्रम घेऊन दिमाखात पार पाडले.

छत्रपती संभाजीनगर येथील माननीय मंत्री अतुल सावे यांचे हस्ते विमोचन झाले. यावेळी विभागीय उपाध्यक्ष विजय गोरे, जिल्हा पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रभरात सर्व जिल्ह्यांमध्ये संघटनेचे जिल्हा पदाधिकारी यांनी मान्यवरांच्या हस्ते विमोचन करून संघटनेच्या एकीचे दर्शन घडविले व सदस्यांना वितरित केले. हा विशेषांक संघटनेचे प्रचार आणि प्रसाराचे प्रभावी माध्यम व मुखपृष्ठ आहे. माजी सैनिकांच्या व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका निभावेल असा विश्वास आहे,असे प्रकाश भिलारे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×