Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव; उष्माघात परिपत्रकानंतरही विद्यार्थ्यांची गैरसोय

जयकर ग्रंथालयात पिण्याच्या पाण्याचा अभाव; उष्माघात परिपत्रकानंतरही विद्यार्थ्यांची गैरसोय

परीक्षेच्या काळात विद्यापीठ प्रशासनावर प्रश्नचिन्ह; तातडीने पाणीपुरवठ्याची मागणी

marathinews24.com

पुणे (रेवण कोळेकर) : परीक्षेच्या तणावपूर्ण काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्रशासनाने दि. १६ एप्रिल २०२६ रोजी उष्माघात प्रतिबंधासाठी परिपत्रक (क्रमांक 64/2026) जारी केले आहे. मात्र, याच वेळी विद्यापीठाच्या प्रसिद्ध जयकर ग्रंथालयामध्ये पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

शारदेश मंगलम् विवाह सोहळा संपन्न; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट – सविस्तर बातमी

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, ग्रंथालयात अभ्यासासाठी येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध नाही. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत चिंताजनक असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड होत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहेत आहे.

या संदर्भात ॲड. प्रशांत पंडितराव इंगोले यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्वरित पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. “विद्यापीठ एकीकडे उष्माघातापासून संरक्षणाचे परिपत्रक काढते, पण प्रत्यक्षात मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करते, हे दुर्दैवी आहे,” असे त्यांनी नमूद केले.

ॲड. अजय देशमुख यांनी या परिस्थितीवर भाष्य करत काव्यरूपातून विद्यापीठ प्रशासनाचे लक्ष वेधले

“जयकर ग्रंथालयात ज्ञानाचा दीप उजळतो,
पण पाण्याविना विद्यार्थ्यांचा घसा कोरडाच राहतो।
पुस्तकांत सागर, पण थेंबही नाही पिण्याला,
प्रशासन जागे व्हा, हक्क द्या जगण्याला।”

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून ग्रंथालयात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांची मागणी आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×