Breking News
सोसायटी सुरक्षारक्षकाच्या पोटात चाकूने वारमाऊलींच्या पालखी सोहळ्यात बिल्डरच्या गळ्यातील ९ लाखांची चैन चोरीलाखिशात हात घालून रोख १५ हजार पळविलेसिमेंटचा गट्टू मारून एकाचा खून करण्याचा प्रयत्नओढे – नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थितीआळंदी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहिमेस गती अलंकापुरी सुनीसुनीमोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्दग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्रीपालखी सोहळ्यावेळी हरवलेल्या महिलेची दिंडी प्रमुखासोबत घडवली भेटमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवाद वारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

वाहन मालकांना अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याची शेवटची संधी

पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आवाहन

marathinews24.com

पुणे – पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी तडजोड शुल्क, मोटार वाहन कर, पर्यावरण कर भरुन लिलावाच्या तारखेपर्यंत सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुण्यात भाजप आमदाराच्या घरात शिरला मद्यपी – सविस्तर बातमी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्यांपैकी ४९ वाहनांच्या प्रकरणांमध्ये वाहन मालक, चालक किंवा वित्तदात्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून ९ जून २०२५ पर्यंत वाहने सोडवून घ्यावीत. या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया गुरुवार, १२ जून २०२५ राेजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार आहे. या वाहने पाहणीकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, एसटी आगार तळेगाव आणि वल्लभनगर व राजगुरुनगर (खेड) एसटी आगारात २६ मे ते १० जून २०२५ या कालावधीत उपलब्ध आहेत.

या वाहनांची यादी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड कार्यालय आणि तळेगाव व राजगुरुनगर (खेड) एसटी आगार कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केलेली आहे. अधिक माहितीकरीता https://eauction.gov.in आणि www.mstcindia.co.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड, संत नगर, मोशी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड ०२०-२७२३२८२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top