Breking News
अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कारकृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’दैनिक प्रभातचे छायाचित्रकार संदीप घोडके यांचे निधनवारकरी संप्रदयाचा अपमान, विकास लवांडे पोलिसांच्या ताब्यातहल्ल्याची १० महिन्यांपुर्वी तयारी, ५ आरोपी अटकेतनागरिकांना ऑनलाईन सेवा विहीत वेळेत उपलब्ध करुन द्याव्यातसिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकारसमाज कल्याण विभागाच्या विविध योजना वंचितांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासकीय विभागांनी कार्यवाही करावीचांगल्या परताव्याचे आमिष पडले ५ लाखांनाआंबेगावात घरफोडी, रोकडसह दागिने चोरीला

नदीच्या पाण्याप्रमाणे प्रवाही व्हायला शिका – सरश्री

Learn to flow like the water of a river - Sirshree

लहान – लहान विश्वासही आपल्या आयुष्यात मोठे परिवर्तन आणतो – सरश्री

marathinews24.com

पुणे – तेजज्ञान फाउंडेशनतर्फे, पुणे स्थित मनन ज्ञान ध्यान केंद्र, सिंहगड रोड येथे ‘छोटे यकीन का बडा जादू’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विशेषतः युवा वर्गाने यात भाग घेऊन आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणावे, असे आवाहन तेजज्ञान फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते.

नऱ्हे परिसरात प्रवासी बसला आग, जीवितहानी टळली – सविस्तर बातमी 

या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून सुमारे 1800+ लोकांनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला तर 13500+ लोक ऑनलाइन सहभागी झाले होते. लहान लहान विश्वासही आपल्या आयुष्यात मोठे परिवर्तन आणतात. माणूस चुकीच्या धारणांच्या साखळ्यांनी जखडला गेला आहे. त्यामुळे एखादी गोष्ट आपण करू शकणार नाही, असं त्याला वाटतं. वास्तवात काहीही अशक्य नाही, हे कल्पना चावला हिचे उदाहरण देऊन सरश्री यांनी सांगितले. विविध कहाण्या तसेच दृक्श्राव्य माध्यमाचा उपयोग करून उपस्थितांच्या मनावर हे बिंबवण्यात आले की स्वतःवर ठाम विश्वास असल्यास काहीही करणे अशक्य नाही.

नियमित ध्यानसाधना केल्याने नकारात्मक विचारांकडून सकारात्मक विचारांकडे आणि शुभ विचारांकडे वळता येते. यासाठी उपस्थितांकडून एका छोट्या ध्यानाचा सराव करवून घेण्यात आला. हा सराव पुढे 21 दिवस सुरू ठेवून ध्यानसाधनेला आपल्या आयुष्याचा भाग बनवावे, असे आवाहन सरश्री यांनी उपस्थितांना केले. संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त तेजविद्या यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक सरश्री यांनी विचारांना योग्य दिशा देऊन, आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यायोगे उच्चतम विकसित समाजाची निर्मिती व्हावी या उद्देशाने तेजज्ञान फाउंडेशनची स्थापना केली आहे. मनन ज्ञान ध्यान केंद्र येथे याच उद्देशाने विविध शिबिरांचे आयोजन केले जाते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×