Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

कंटेनरला उटी लावण्याच्या नादात जीव गमवला

दुभाजकावर दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू भरधाव

अंगावरून चाक गेल्याने चालक ठार

marathinews24.com

पुणे – अवजड कंटेनरच्या चाकाला उटी (अडथळा) लावण्याच्या नादात चालकाने स्वतःचा जीव गमवला आहे. भरधाव कंटेनर उतारावरून खाली येत असताना अंगावरून चाक गेल्यामुळे चालक ठार झाला आहे. हा अपघात १० डिसेंबरला कात्रज घाटातील भिलारेवाडीकडे जाणार्‍या उतारावर घडला आहे. तानाजी सहदेव सिद्ध वाडकर वय ३५ रा. आदिहुडी ता. जामखंडी, कर्नाटक असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार नानासाहेब जगताप यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात डिलीव्हरी बॉयवर अल्पवयीन मुलीने टाकले जाळे – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अमलदार जगताप हे बीटमार्शल असून, १० डिसेंबरला रात्रपाळीला कामाला होते. त्यावेळी त्यांना नियंत्रण कक्षातून कात्रज घाटातील अपघाताची माहिती मिळाली. त्यानुसार ते घटनास्थळी गेले असता, प्रत्यक्षदर्शी उपस्थितांनी अपघाताची त्यांना माहिती दिली. अवजड कंटेनर चालक तानाजी वाडकर हा कंटेनर घेउन कात्रज घाटातून जात होता. त्यावेळी त्याने कंटेनर उतारावर उभा केला होता.

कंटेनरचा हवा भरण्याचा पाईप फुटल्यामुळे तो उतारावरून खाली सरकत होता. त्यामुळे तानाजीने खाली उतरून उटी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंटेनरचा वेग जास्त असल्यामुळे कंटेनरचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्यामुळे तानाजीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×