Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

वसुबारस सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे आवाहन

गोमातेच्या सन्मानातून ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचा सन्मान

marathinews24.com

पुणे –  महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी राज्यातील सर्व गोशाळा संचालक, शेतकरी, पशुपालक आणि गोपालक बांधवांना वसुबारस सप्ताह उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

अनुपम जोशी यांच्या सरोद वादनाची रंगली मैफल..! – सविस्तर बातमी

गोमातेचे दैनंदिन जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व ओळखून शासनाने “गोमातेला राज्य मातेचा” दर्जा दिला आहे. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यंदा दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी वसुबारस या सणाने दीपोत्सवाला प्रारंभ होत आहे. हा दिवस कृषी आणि पशुपालन संस्कृतीशी घट्टपणे जोडलेला असल्याने तो मोठ्या श्रद्धेने साजरा करणे हे प्रत्येक शेतकरी व गोपालकाचे कर्तव्य असल्याचे मुंदडा यांनी सांगितले.

वसुबारस सप्ताहाच्या निमित्ताने राज्यभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या उपक्रमांमध्ये व्याख्याने, गोपूजन, शाळांमधील चित्रकला स्पर्धा, “सेल्फी विथ राज्यमाता” अशा कार्यक्रमांचा समावेश करावा .

या उपक्रमांच्या आयोजनात सर्व गोशाळा संचालकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, जेणेकरून कृषी व गोसंस्कृतीला सक्रिय चालना मिळेल, असेही आवाहन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील यांनी केले आहे. तसेच आयोजित कार्यक्रमांचा अहवाल व छायाचित्रे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या ई-मेल mhgosevaayog@gmail.com वर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×