गोखलेनगरात महिलेला लुटले, भरदिवसा मंगळसूत्र चोरीची घटना
Marathinews24.com
पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी ७० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ११ एप्रिलला भरदिवसा सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जनता वसाहतीत राहणार्या ६४ वर्षीय महिलेने चतुशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशाने वकीलासह बँक अधिकार्यावर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला जनता वसाहतीतील साईराम चौकात राहायला आहेत. ११ एप्रिलला भरदिवसा सकाळी अकराच्या त्या पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या एका चोरट्याने त्यांच्याजवळ दुचाकी उभी केली. त्यानंतर अवघ्या काही क्षणात त्याने महिलेचे ७० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून दुचाकी दामटली. जेष्ठ महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटा सुसाट पसार झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.
धायरीतील भरदिवसा लुटीची घटना ताजी
दुचाकीवर चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्याने तिच्या गळ्यातील १ लाख ५० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. ही घटना २४ मार्चला भरदिवसा पावणेपाच वाजण्याच्या सुमारास धायरीतील त्रिमुर्ती फ्लोअर मिलजवळ घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार महिला धायरी परिसरात राहायला असून, २४ मार्चला संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास धायरी फाटा परिसरातून दुचाकीवर जात होती. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागून आलेल्या चोरट्याने महिलेजवळून दुचाकी चालविली. त्यांच्या गाडीचा वेग कमी होताच, चोरट्याने महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावले.