पुणे विमानतळावर प्रवाशाकडून १० कोटींचा गांजा जप्त

अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँकाँकहून पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाला केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने पकडले. त्याच्याकडून दहा किलो रासायनिक प्रक्रिया केलेला गांजा (हायड्रोपोनिक गांजा) जप्त केला. आंतराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या गांजाची किंमत १० कोटी ५ लाख रुपये आहे. अभिनय अमरनाथ यादव असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

ज्येष्ठाला जखमी अवस्थेत निर्जनस्थळी टाकून रिक्षा चालक पसार – सविस्तर बातमी

त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादवला शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी महिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अभिनय यादव हा बँकाँकहून २४ जुलै राोजी पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरले. तो गडबडीत विमानतळातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. कस्टमच्या पथकाने त्याच्या संशयास्पद हालचाली पाहिल्या. त्याला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्याच्चा बॅगेत रायासनिक प्रक्रिया केलेला गांजा जप्त करण्यात आला जप्त केलेल्या गांजाची किंमत आंतराष्ट्रीय बाजारात १० कोटी ५ लाख रुपये आहे.

यादवने गांजा काेणाकडून आणला, तसेच तो पुण्यात गांजा कोणाला देणार होता,यादृष्टीने तपास सुरू असल्याचे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विमनतळावर आठवड्यापूर्वी परदेशी पक्ष्यांची तस्करी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमान तळावरुन अमली पदार्थ तस्करी प्रकरणात प्रवाशांना अटक करण्यात आली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×