Breking News
अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमारउच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रस्तावित कोचिंग क्लासेस नियमन कायदा करण्यापूर्वी राज्य सरकारने पीटीए शी संवाद साधावाउद्योजकतेला बळ, स्वावलंबनाला दिशा! – विशेष लेखपुणे व्यापाऱ्यांच्या जिएसटी प्रश्नांसाठी भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकारपुण्याच्या विकासात अपयशी ठरलेल्या ‘पीएमआरडीए’ला टाळे ठोकण्याची वेळभरती परीक्षा सुधारणांसाठी १२ सप्टेंबरला पुण्यात सल्लामसलतरोजगार महाकुंभ अंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजनकात्रज-कोंढवा रोडवर भरधाव वाहनाने शाळकरी मुलींना उडवलेपुण्यात नशाखोरांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरलापोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

मुलगा नपुंसक असतानाही केला विवाह

खंडणीच्या कथित गुन्ह्यात महिलेला गुंतवणाऱ्या समर्थ पोलिसांना पुणे कोर्टाकडून  चपराक

पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – मुलगा नपुंसक असताना विवाह करुन फसवणूक, तसेच छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. २३ वर्षीय तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती, सासू-सासरे, नणंद, तिचा पती, चुलत सासरे यांच्यासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंटेनरला उटी लावण्याच्या नादात जीव गमवला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा १८ एप्रिल रोजी एका ३२ वर्षीय तरुणाशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती नपुंसक असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने याबाबतची माहिती सासू-सासऱ्यांना दिली. त्यानंतर सासू-सासरे आणि नातेवाईकांनी तिला धमकावले. पती नपुंसक असल्याचे कोणाला सांगितल्यास त्याचे गंभीर परिणाम भाेगावे लागतील, अशी धमकी देऊन तरुणीचा छळ सुरू करण्यात आला. तरुणीचे एकाबरोबर प्रेमप्रकरण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

पती,सासू-सासरे, तसेच नातेवाईकांनी माझी बदनामी केली. विवाहात मानपान केला नाही, असे सांगून माझा छळ केला. माहेरुन पैसे आणि सोने आण्याची मागणी केली, असे तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक मगदूम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×