पुण्यातील वानवडीत घटना
marathinews24.com
पुणे – भोपाळमधील एम्स रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाने पुण्यातील वानवडी परिसरात स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली आहे. उत्कर्ष महादेव हिंगणे (वय १८, मूळ रा. बीड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. त्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची प्राथामिक माहिती आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हाट्सअपवरती सुसाईड नोट लिहली आहे.
कोंढव्यात तरुणाच्या डोक्यात दगड मारून केला खून – सविस्तर बातमी
उत्कर्ष हिंगणे याने आपण आत्महत्या का करत आहे याचे कारण सांगितले आहे. त्याचे वडील देखील डॉक्टर आहेत. पंचरत्न हाऊसिंग सोसायटी फातिमानगर वानवडीत एक मुलगा गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये आढळून आला आहे. त्याने व्हाट्सअपवर आत्महत्या करत असल्याचे पोस्ट टाकली आहे. सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास नियंत्रण कक्षाला याबाबतचा कॉल होता. त्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत तपासाला गती दिली.